Breaking
आरोग्य-शिक्षणछत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार: दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन पाहता येईल, मंगळवारपासून महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका.

0 7 8 0 1 6

उपसंपादक – कल्पेश महाले 

पुणे – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी, पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या निकालाबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबद्दलची माहिती दिली आहे. उद्या 5 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. यंदा ही परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधी घेण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल, विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. तर 6 मे मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.

खालील वेबसाइट्सवर निकाल पाहता येतील

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

निकाल कसा चेक कराल?

सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.

होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी / एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

ICSE, ISC बोर्डाचे निकाल जाहीर

दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 8 0 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे