लोकमत चे पत्रकार सुनील लोहार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका उपप्रचार संयोजक पदी निवड.
लोकमत चे पत्रकार सुनील लोहार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका उपप्रचार संयोजक पदी निवड.
पाचोरा – पाचोरा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका उपप्रचार संयोजक पदी कुऱ्हाड खुर्द येथील सुनील लोहार यांची निवड करण्यात आली. पाचोरा येथील राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र भडगाव तालुका अध्यक्ष संजय मोरे (सरकार) यांच्या वतीने मिळाले आहे.
भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी ( २४/०६/२०२४ ते २३/०६/२०२७ ) या कालावधीसाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका उपप्रचार संयोजक पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्थरावरून लोकमत चे पत्रकार सुनील लोहार यांचे अभिनंदन केले जात आहे.