Breaking
ब्रेकिंग

संकटाच्या काळात मदतीचा हात : पारोळा-एरंडोलमधील पूरग्रस्त कुटुंबांना आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते शिधा किट वाटप…!

संकटाच्या काळात मदतीचा हात : पारोळा-एरंडोलमधील पूरग्रस्त कुटुंबांना आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते शिधा किट वाटप...!

1 0 8 6 6 3

इमरान शेख उपसंपादक

पारोळा/एरंडोल, दि. 13 ऑगस्ट रोजी शिधा किट वाटप संपन्न ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन घरांमध्ये पाणी शिरले, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि अनेक कुटुंबांसमोर दैनंदिन जीवनावश्यक गरजांचा प्रश्न उभा राहिला.

या संकटाच्या काळात आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटुंबांना तातडीने मदत मिळावी यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना देत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील ६४ आणि एरंडोल तालुक्यातील ३७ अशा एकूण ६८१ पात्र पूरग्रस्त कुटुंबांना शिधा किट मंजूर करण्यात आले.

आज या दोन्ही तालुक्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते शिधा किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे पूरस्थितीमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाहणीपासून मदतीपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा.!

पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आमदार पाटील यांनी केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ६४ कुटुंबांना शिधा किटच्या माध्यमातून मदत उपलब्ध झाली.

एरंडोल तालुक्यातील नांदखुर्दे सह परिसरातील ३७ पात्र कुटुंबांसाठीही तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली.

प्रशासनाशी समन्वयावर भर…

आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासन यांच्यात योग्य समन्वय साधण्यावर आमदार पाटील यांनी भर दिला. पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढेही पाठपुरावा सुरू राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आज एकूण ६८१ कुटुंबांपर्यंत शिधा किटच्या माध्यमातून मदतीचा हात पोहोचला असून, संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

आपत्तीच्या काळात केवळ पाहणी नाही, तर मदत मिळेपर्यंत पाठपुरावा!

पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रत्यक्ष मदत मिळवून देणे — हीच जनसेवेची बांधिलकी!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 8 6 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे