Breaking
ब्रेकिंग

कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ “हिवताप दिन कार्यक्रमाचे आयोजन…!

कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ "हिवताप दिन कार्यक्रमाचे आयोजन...!

0 9 6 5 0 1

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षी २५ एप्रिल हिवताप दिन  म्हणून  साजरा करण्यात येतो.

एरंडोल तालुक्यातील कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे “हिवताप दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मा. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले असता आरोग्य पर्यवेक्षक श्री. भंगाळे साहेब यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा घेतला. या वर्षी हिवताप विभागा द्वारे

“हिवताप दुरिकरणासाठी कथिबध्द: आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे.” या स्लोग्नाने सर्वांचे लक्ष वेधण्यात आले होते.यामध्ये विविध कार्यक्रम करुन हिवताप आजारा विषयी जनजागृति करण्यात आली. यामध्ये आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच कंटेनर सर्वेक्षण ,जलद ताप रुग्ण सर्वेक्षण इत्यादी कार्य करण्यात आले श्री. मिलिंद गायकवाड (आरोग्य निरीक्षक)यांच्या मार्गदर्शनाखाली वरील विविध सर्वेक्षण व

जनजागृति  विविध गावांमधे करण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजपूत मॅडम (वैद्यकीय अधिकारी)  , श्री. गढरी (पी.ओ.),  श्री राजेश पवार (एलएसओ)श्री. पी. रायगड़े आ. सहा. यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.

कासोदा प्रा. आ.केंद्र अंतर्गत येणारे उपकेंद्रा द्वारे देखील विविध कार्यक्रम राबविण्यात आले. श्रीम. सीमा पानपाटील या गटप्रवर्तक यांनी सर्व आशा  यांना विविध कार्यक्रमाचे नियोजन करून त्यांना विविध गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम राबविण्यास मदत केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 6 5 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे