ब्रह्माकुमारीज नशामुक्ती जनजागृती अभियानास कासोद्यात मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!
ब्रह्माकुमारीज नशामुक्ती जनजागृती अभियानास कासोद्यात मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

इमरान शेख उपसंपादक
व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा चा दिला संदेश
कासोदा, दि. 4 ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ जनजागृती उपक्रमाला कासोदा परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्रह्माकुमारीज कासोदा उपसेवाकेंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाला कासोदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, आर्यन हायस्कूलचे प्राचार्य जितेंद्र गजरे, राजाभाऊ पतपेढीचे अध्यक्ष संजय नवल, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाटील, समाजसेवक मुकेश पाळधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ब्रह्माकुमारीज कासोदा उपसेवाकेंद्राच्या संचालिका बीके मीरा दीदी, बीके आशा दीदी, सूत्रसंचालिका वर्षा बहन, मीनाक्षी बहन, माजी मुख्याध्यापक रामलाल गुरुजी, तुकाराम बाबा निपाणी, विक्रम पाटील लोन आणि गोकुळ ब्राह्मणकर* हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, व्यसनमुक्त समाज घडवणे ही काळाची गरज आहे. युवक आणि विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित जीवन जगावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान ब्रह्माकुमारीजतर्फे सर्व उपस्थितांना *व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा* देण्यात आली. “व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा” हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मान्यवर, शिक्षक, समाजसेवक आणि ब्रह्माकुमारीजच्या सेवाधारी भगिनींनी सक्रिय सहकार्य केले.



