कासोदा पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण कासोदा पोलिसांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश…!
कासोदा पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण कासोदा पोलिसांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश...!

कासोदा शहरातील पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण संदेश ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करत कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या कासोदा पोलीस स्टेशनचे वतीने शनिवारी दि. २७जून रोजी पोलीस ठाणे आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे, असा संदेश यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते रोपटे लावून करण्यात आली.
यावेळी बोलताना श्रीकांत पाटील सर म्हणाले, पोलिसांचा नेहमीचा दिवस गुन्हेगारी रोखण्यात आणि तपासात जातो. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पोलिसांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करणेही तितकेच गरजेचे आहे.या वृक्षारोपणात देशी आणि पर्यावरणपूरक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. लावलेली सर्व झाडे जगवण्याचा संकल्प यावेळी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील सर व पोलीस उपनिरीक्षक ,यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि पत्रकार सागर शेलार. प्रमोद अण्णा पाटील. शैलेश पांडे. ऍडव्होकेट वासुदेव वारे. शैलेश मंत्री.आणि पोलीस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले…



