Breaking
ब्रेकिंग

मालखेडे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची भक्तिमय वातावरणात आषाढी वारी संपन्न…!

मालखेडे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची भक्तिमय वातावरणात आषाढी वारी संपन्न...!

1 0 6 2 3 7

उपसंपादक :-इमरान शेख

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालखेडे ता. एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त ‘शिक्षणाची वारी’ उत्साहात साजरी करण्यात आली. या वारीत पालखी दिंडीसोबतच वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडी हे विशेष आकर्षण होते.

सकाळपासूनच शाळेत उत्साहाचे वातावरण होते. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी वेशात सहभागी झाले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. शितल पवन पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करून संपूर्ण गावात दिंडी काढण्यात आली.

कु. वेदिका पाटील व तनुजा पाटील यांनी संत मुक्ताबाई व जनाबाई यांच्या ओव्या सादर केल्या. विद्यार्थिनी, शिक्षिका व गावातील महिलांनी फुगडीचा आनंद घेतला.

कार्यक्रमाला प्र. सरपंच सचिन पाटील, मा. सरपंच ईश्वर पाटील, पोलिस पाटील किशोर पाटील, ग्रामसेवक मनोहर महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती विद्या लाडगे व श्रीमती क्रांती साळुंखे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 2 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे