चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे पिराचे येथील धरणात 5 तरुण बुडाले; एकाचा बुडून मृत्यू…!
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे पिराचे येथील धरणात 5 तरुण बुडाले; एकाचा बुडून मृत्यू...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
चाळीसगाव: तालुक्यातील नागदरोडवरील पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहायला गेलेल्या चाळीसगाव शहरातील पाच तरुणांपैकी एका २० वर्षीय सिंहवैद्यकीय विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
ऐन ईदच्या सणात काळाचा घेरावा चाळीसगाव शहरातील रहिवासी आणि बीएएमएसचे शिक्षण घेणारा तरुण मोईन झारेकरी हा ईदच्या सुट्टीनिमित्त गावी आला होता. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो आपल्या चार मित्रांसह नागदरोडवरील बोरखेडा धरणात पोहण्यासाठी गेला होता.
स्थानिकांकडून अथक शोधमोहीम
पाण्यात पोहत असताना अचानक मोईन पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. हे पाहून त्याच्या इतर चार मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत मोईन पाण्यात खोलवर बुडाला होता.
ही माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने तब्बल तीन ते चार तास शोधमोहीम राबवून, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोईनचा गाळात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
शोककळा:-तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मोईनच्या कुटुंबियांवर व परिसरात मोठा शोककळा पसरली असून, एका हसतखेळत्या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.


