पारोळा व एरंडोल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची संयुक्त पत्रकार परिषद आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली…
पारोळा व एरंडोल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची संयुक्त पत्रकार परिषद आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली...

पारोळा तालुका प्रतिनिधी:-
पारोळा व एरंडोल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची संयुक्त पत्रकार परिषद पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार चिमणराव आबा पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, किशोरभाऊ काळकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती घटकपक्षांमधील युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. त्यानुसार आज भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण व जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा नगरपालिका नगराध्यक्ष पद शिवसेना आणि एरंडोल नगरपालिका नगराध्यक्ष पद भारतीय जनता पक्ष लढवेल असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
वार्ड स्तरावरील नगरसेवक पदांच्या जागांचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, त्यासाठी ३ ते ४ सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. काही जागांवर तिढा निर्माण झाल्यास तो जिल्हास्तरावर किंवा विभागीय पातळीवर मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सोडवण्यात येईल.
महायुती सरकार राज्यात आणि युतीचे डबल इंजिन स्थानिक पातळीवर कार्यरत असल्यामुळे पारोळा व एरंडोल या दोन्ही शहरांचा विकास झपाट्याने होईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
आगामी निवडणुकीत दोन्ही नगरपालिकांवर भाजपा-शिवसेना महायुतीचाच भगवा फडकेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.



