कासोदा येथे हिस्से वाटणीच्या वादातून तुंबळ हाणामारी; दोन्ही गटांतील परस्पर विरोधी गुन्हे दाखल..!
कासोदा येथे हिस्से वाटणीच्या वादातून तुंबळ हाणामारी; दोन्ही गटांतील परस्पर विरोधी गुन्हे दाखल..!

कासोदा शहरातील टी.टी.एस. चौक येथे हिस्से वाटणीच्या वादातून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात झालेल्या हाणामारीचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आहे याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सविस्तर
हिस्से वाटणीच्या वादा अंगलट येवुन कासोदा पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले
आज दिनांक 04/04/2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता कासांदा शहरातील टी.टी.एस. चौक परिसरात दोन गांमध्ये आपसी रंजीशातुन हिस्से वाटणीचा वाद चकाट्यावर आणुन त्याचे रूपांतर मारहाण तसेच गंभीर दुखापतीच्या घटनेत झाले. सदर प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे कासोदा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले आहेत
.पहिल्या फिर्यादीत शेख मुद्दस्सर उर्फ अबु शेख फिरोज (वय 28 वर्षे, रा. शेख मोहल्ला, कासोदा) यांनी नमूद केले आहे की, हिस्से वाटणीच्या कारणावरून वाद झाला असून त्यावेळी विरोधी पक्षातील व्यक्तींनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच धारदार शस्त्राने (चाकू) गंभीर दुखापत केली व त्यांच्या अँक्वा पाण्याच्या गाडीचे नुकसान केले बाबत 05 आरोपीतांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या फिर्यादीत शेख शाहदाब शेख मुस्ताक (वय 32 वर्ष, रा. शेख मोहल्ला, कासोदा) यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या भावासोबत झालेल्या वादातून काही व्यक्तींनी त्यांच्या अॅक्वा पाण्याच्या दुकानासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केली, दुकानात घुसून तोडफोड केली तसेच लोखंडी पाईपने मारून गंभीर दुखापत केली बाबत 05 आरोपीतांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सदर घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून, मारहाण, गंभीर दुखापत, धमकी व मालमत्तेचे नुकसान या कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.
पोलीसांनी दोन्ही फिर्यादीच्या आधारे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य बघता तसेच कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोणातून गुन्ह्यात आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
परस्पर विरोधी दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पोहेका राकेश खोंडे व पोहेका/किरण गाडीलोहार करीत आहे.



