भडगाव शहर व ग्रामीण भागातील पावसाचा कहर – प्रशासन सतर्क, नागरिकांना इशारा.!!!
भडगाव शहर व ग्रामीण भागातील पावसाचा कहर - प्रशासन सतर्क, नागरिकांना इशारा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-
भडगावं : भडगाव तालुक्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या धो-धो मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. सलग पावसामुळे लहानमोठ्या नद्या, नाले व ओढ्यांचा प्रवाह वाढून पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून तातडीने सावधानतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नदीकाठ, नाल्याजवळ किंवा पाणथळ भागात भटकंती करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे, तसेच शेतीमालाचे रक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील सर्व, सरपंच पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना गावातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून नुकसानीची माहिती प्रशासनाला तात्काळ कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरपाणी शिरणे, रस्ते खचणे, झाडे पडणे, वीज खंडित होणे अशा घटना त्वरित नोंदवून मदतकार्य सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
भडगाव शहर व ग्रामीण भागातील निचांकी वस्त्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलण्याचा सल्ला दिला जात आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या आहेत.
तहसीलदार भडगाव यांचे आवाहन
नागरिकांनी शांत राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा.”