कासोदा पोलिसांची धडक करवाई,उत्राण जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात एक जण पसार
कासोदा पोलिसांची धडक करवाई,उत्राण जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात एक जण पसार

प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
उत्राण :एरोंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात कासोदा पोलीस गुप्ता माहितीच्या आधारे उत्राण गु.ह. शिवारातील
एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, दीपक देसले यांच्या पथकासह छापा घातला. घटनास्थळी आरोपी जमिनीवर बसून पत्त्यांच्या खेळावर पैसे लावताना दिसले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रु. ५,९५०/- रोख, अंदाजे रु. १०,०००/-किमतीचा मोबाईल फोन व अंदाजे रु. ४५,०००/- किमतीची मोटारसायकल असा एकूण रु. ६१,६५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोकॉ/५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शना खाली कासोदा पोलिस करीत आहेत.