Breaking
ब्रेकिंग

भडगाव आरोग्य केंद्राच्या वतीने पल्स पोलिओ व विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न…!

भडगाव आरोग्य केंद्राच्या वतीने पल्स पोलिओ व विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न...!

1 0 3 9 2 4

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव शहरातील आज ३० जून रोजी जिल्हा परिषद मुलांची उर्दू शाळा यशवंतनगर ला भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम’ व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. बालकांना पोलिओपासून सुरक्षित ठेवणे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहणे या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भडगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत झाली. सुरुवातीला पाच वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओचे डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शाळेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.

यामध्ये मुलांची उंची, वजन, डोळे, दात, त्वचा आणि एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्याची बारकाईने पाहणी करण्यात आली.तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि काही विद्यार्थ्यांना आवश्यक औषधोपचार व जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात भडगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर, परिचारिका (नर्स), आशा स्वयंसेविका आणि शाळेतील शिक्षक-शिक्षिका यांनी मोलाचे योगदान दिले. परिसरातील पालकांनी व ग्रामस्थांनी या आरोग्यदायी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

भडगाव आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शाळेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी बारकाईने पाहणी केळी त्या वेळी डॉ, सचिन पाटील,MD,डॉ, प्रियंका, इंगोले LMD,आरोग्य, सेविका,वैशाली वाघ चवरे,फर्माशिस, मीनाक्षी देशमुख,फार्मशिस्,याचिका ढोले,

त्या वेळी उपस्थित  भडगाव नगरपरिषदाचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती सय्यद इमरान अली. विद्यमान नगरसेवक जितू अचारी व शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष पत्रकार हय्युम सय्यद व उपाध्यक्ष नाझिम मेहमूद शेख व सर्व सदस्य, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक शेख खालील सर, शिक्षक अब्दुल जावेद सर, सय्यद शाहिद सर, तसलीम खान सर,नूर सर,जुनेद सर,व पालक वर्ग उपस्थित होते

 

शेवटी भडगाव आरोग्य केंद्राच्या टीम वतीने उपस्थितांचे आभार मानले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 9 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे