Breaking
कृषीवार्ताछत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

चाळीसगांव येथे धान्य नोंदणीसाठी रात्रभर शेतकरी मुक्कामी

0 7 5 6 9 0

दिवसभरात ४० शेतकऱ्यांची नोंदणी, आज पुन्हा तीन तास सर्व्हर पडले बंद

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगांव – धान्य खरेदीसाठी गेल्या १ एप्रिलपासून नोंदणी सुरू होवून देखील गेले सहा दिवस शासनाचे पोर्टल बंद असल्याने येथील शेतकरी सहकारी संघाच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी रविवारपासून गर्दी केली होती. मात्र पोर्टल सुरू झालेच नाही. रात्रीपासून शेतकरी केंद्रावर मुक्कामी थांबले होते. अखेर सोमवारी पोर्टल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन नोंदणीची सुरूवात झाली. मात्र दुपारी दोन ते तीन तास पुन्हा सर्व्हर बंद पडल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनचा वारंवार फटका बसत असल्याने दिवसभरात केवळ ४० शेतकऱ्यांची नोंदणी होवू शकली.

नोंदणीसाठी आयडी वाढवण्यासाठी जिल्हा विपणन अधिकारी यांच्याशी संपर्क करून सांगतो. व नोंदणीच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मी शेतकी संघाचे अध्यक्ष यांच्याची लगेच बोलतो. शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ. – मच्छिंद्र राठोड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव

दोन आयडींची शेतकऱ्यांकडून मागणी

◾ दोन आयडींची मागणी केली शेतकऱ्यांनी गर्दी न करता शांततेत नोंदणी करावी. जिल्हा विपणन अधिकारी यांनी एकच आयडी दिली आहे. तरी ३० तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाईल. दोन आयडींची मागणी केली आहे.  – शशिकांत साळुंखे, अध्यक्ष शेतकी संघ 

नोंदणीसाठी रात्रीपासून अंधारात बसलो. 

शेतकऱ्यांनी रात्रीपासून नोंदणीसाठी नंबर लावले होते. सकाळी लवकर नंबर लागावा यासाठी आम्ही अंधारात बसलो होतो. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. संघाने नोंदणीसाठी आयडी वाढवावी. जेणेकरून शेतकऱ्यांची नोंदणी लवकर होईल.

– गुलाब साळुंखे, शेतकरी खेडगाव

 

सर्व उपस्थित शेतकऱ्यांना शेतकी संघाने नंबर नुसार  टोकन द्यावे

रविवार रात्री पासून शेकडो शेतकऱ्यांनी रात्रभर उपस्थित राहून नंबर लावलेले आहेत. एका दिवसात अंदाजे जेवढी नोंदणी होईल तेवढेच शेतकरी नंबर नुसार या ठिकाणी बोलवावे. अन्य शेतकऱ्यांना शेतकी संघाने टोकन दिले पाहिजे. व त्या टोकन नुसार शेतकऱ्यांना कॉल करून बोलावले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांची भर उन्हात गैरसोय होणार नाहीत.

– दिपक खंडाळे, शेतकरी उंबरखेड 

अशी माहिती शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी दिली. यानिमित्ताने शासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

एका नोंदणीसाठी आठ ते दहा मिनिटे 

रविवार पासून नोंदणी सुरु झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रात्रीचा मुक्काम ठोकला होता. एका नोंदणीसाठी आठ ते दहा मिनिटे लागत होते. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत होते. सोमवारी दिवसभरात ४०० ते ५०० शेतकरी उपस्थित झाले होते. दिवसभरात ४० शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली. सकाळी नोंदणीवेळी थोडा गदारोळ झाला होता. रात्री मुक्कामी असलेले शेतकऱ्यांना डासांचा त्रास तसेच प्यायला पाणी देखील मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. सध्या उन्हाळा सुरु असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे तसेच गुरांना चारापाणी करणे शेतकऱ्यांना काम सोडून नोंदणीसाठी दिवसवाया गेल्याने संताप व्यक्त केला.

शेतकरी रात्रभर पासून रांग लावून

राज्य शासनाच्या हमी भावाने ज्वारी, मका, बाजरी, आदी भरडधान्य खरेदीसाठी १ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. ही नोंदणी येत्या ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र गेले सहा दिवस पोर्टल बंद असल्याने  शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रविवारीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका आदी धान्याच्या ऑनलाईन नाव नोंदणीसाठी येथील शेतकरी सहकारी संघाचे कार्यालय गाठले. तळपते उन्ह व अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा अशा अवस्थेत शेतकरी रांगा लावून होते. मात्र रविवारी दिवसभरात पोर्टल सुरूच न झाल्याने शेतकऱ्यांना रात्री मुक्कामी थांबावे लागले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 6 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे