कासोद्यात शिवसेनेत मोठा प्रवेश मुख्तार सर यांची मागणी नागरिकांचे पैसे वाचवण्यासाठी गिरणा पाणी द्या.आमदार अमोलदादांच्या नेतृत्वावर विश्वास…!
कासोद्यात शिवसेनेत मोठा प्रवेश मुख्तार सर यांची मागणी नागरिकांचे पैसे वाचवण्यासाठी गिरणा पाणी द्या.आमदार अमोलदादांच्या नेतृत्वावर विश्वास...!

सत्यकाम न्यूज नेटवर्क
कासोद्यात राजकीय ‘भूकंप’ राष्ट्रवादीच्या शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार अमोलदादा पाटलांची वाढती ताकद चर्चेत
कासोदा गावातील दि. 18 जुलै रोजी जाहीर प्रवेश संपन्न एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून कासोदा येथली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना-युवासेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नामदार शाह बाबा दर्गा कासोदा येथे शिवसेना युवासेना शाखा कासोदा व कासोदा मुस्लिम समाज यांच्यावतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. ढोल-ताशे आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मुख्तार सर म्हणाले, गेल्या 5 वर्षांपासून कासोद्यातील जनतेला 40 रुपयाला एक्वा पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पैशाला पाणी घेण्याऐवजी नागरिकांना मोफत आणि स्वच्छ गिरणा पाणी द्या. नागरिकांचे पैसे वाचवा.
या कार्यक्रमात पाणीप्रश्नावरही आवाज मुख्तार सर यांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आज नागरिकांना पैशाला पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. आम्हाला गिरणा पाण्याची सोय करून द्या, जेणेकरून नागरिकांचे पैसे वाचतील.”
या कार्यक्रमात आमदर अमोल दादा पाटील म्हणाले मी आहे तोपर्यंत कासोद्याची राहिलेली सर्व विकास कामे करून देणार अशी ग्वाही देण्यात आली. जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील म्हणाले की, पाणीप्रश्न आमदार साहेबां लवकरात लवकर तोडगा काढू…
प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. वासुदेव सुभाष पाटील, तालुकाप्रमुख श्री. रवींद्र भाऊ जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख श्री. कमलेश पाटील, माजी युवासेना तालुकाप्रमुख श्री. बबलू पाटील उपस्थित होते.
याशिवाय दूध संघ संचालक श्री. दगडू धोंडू चौधरी, शहर संघटक श्री. संदीप मराठे, युवा सेना शहर प्रमुख श्री. सोनुभाऊ शेलार पैलवान, अल्पसंख्याक आघाडी तालुकाप्रमुख अॅड. अहमद जे सैय्यद, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. भाऊसो मनोज भाऊ पाटील पैलवान, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. तात्यासो सुदाम राक्षे, माजी जि.प. उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर धोंडू आमले, शिवसेना शहरप्रमुख व माजी सरपंच श्री. महेश बापू पांडे, सरपंच श्री. पुरुषोत्तम भास्कर चौधरी, उपशहर प्रमुख श्री. अमोल सुरेश पवार, गटप्रमुख श्री. भूषण भाऊ शेलार पैलवान, अल्पसंख्याक आघाडी उप जिल्हाप्रमुख श्री. जावेद मुजावर, नगरसेवक श्री. रुपेश माळी, श्री. अनिल महाजन आणि श्री. अमोल तबली यांची विशेष उपस्थिती होती.
जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील म्हणाले, “आमदार अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वामुळे सर्व समाज शिवसेनेसोबत येत आहे. पाणीप्रश्न लवकरच मार्गी लावू.”
आयोजक: , जुल्फीकार अली सय्यद,मुख्तार सर. इमरान मुजावर, तावकल शेख, बिलाल काझी, अजमल पठाण .सय्यद अफसर. गफार अली. अल्ताफ अली जुबेद अली. आरिफ अली. इस्तक अली. बशीर मेम्बर व सहकारी मित्र 15 बॉज गुर्प
या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कासोदा परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
कासोद्यात राष्ट्रवादीला धक्का; शिवसेनेत मोठा प्रवेश
आमदार अमोलदादा पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कासोदा राष्ट्रवादीच्या शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमात मुख्तार सर यांनी “नागरिकांना पैशाला पाणी विकत घ्यावे लागत आहे, गिरणा पाणी द्या” अशी मागणी केली. आमदर अमोलदादा पाटील सहा सर्व शिवसेना चे पदाधिकारी उपस्थित होते



