Breaking
ब्रेकिंग

ब्रह्माकुमारीज् तर्फे कासोदा येथे आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिनानिमित्त शांतता रॅलीचे आयोजन..!

ब्रह्माकुमारीज् तर्फे कासोदा येथे आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिनानिमित्त शांतता रॅलीचे आयोजन..!

0 9 9 3 2 8

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे  २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिनानिमित्त कासोदा येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात विशेष जनजागृती कार्यक्रम व भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे समाजात शांतता, प्रेम, बंधुभाव आणि अहिंसेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मौन पाळून करण्यात आली. उपस्थितांना आतंकवादामुळे मानवजातीसमोर निर्माण होणारे गंभीर धोके तसेच त्यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर कासोदा शहरातून भव्य शांतता रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विविध समाजघटक, महिला, युवक-युवती तसेच ब्रह्माकुमारी परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

“शांतता हाच खरा मार्ग”, “दहशतवादमुक्त भारत घडवूया”, “विश्वशांती हीच मानवतेची गरज” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

रॅलीदरम्यान नागरिकांना शांतता, सद्भावना आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. तसेच युवकांनी हिंसा, दहशतवाद व व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी देशात व जगात कायम शांतता नांदो यासाठी सर्वांनी सामूहिक शांततेची प्रतिज्ञा घेतली.

शांतता रॅलीचे कुशल संचलन ब्रह्माकुमारी मिरादीदी, संचालिका कासोदा उपसेवाकेंद्र, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी तसेच सेवाकेंद्रातील सर्व ब्रह्माकुमारीज् सदस्यांनी केले. कासोदा पोलीस स्टेशन व जयेश पिल्लोरे व मित्रमंडळ गणेश पाटील, नंदू भाऊ पहिलवान व मित्रमंडळ व स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमास विशेष सहकार्य केले.

नवदशकोत्सव उपक्रम

ब्रह्माकुमारी संस्थेच्या स्थापनेच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त ब्रह्माकुमारी जळगाव सब झोन अंतर्गत आयोजित नवदशकोत्सव कार्यक्रम व उपक्रम शृंखलेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 3 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे