मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन पाटील सर यांचा विशेष सत्कार…!
मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन पाटील सर यांचा विशेष सत्कार...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
चालीसगाव तालुक्यातील दि. १८ जून गुरवार रोजी मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी PI नितीन पाटील सर यांचा खेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
खेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांच्या हस्ते नितीन पाटील सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात भाजपाचे नेते महेश तात्या साळुंखे यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन पाटील सर यांच्या स्वागतासाठी परिसरात आनंदाचे वातावरण होते.
सत्काराला उत्तर
सत्कार स्वीकारल्यानंतर नितीन पाटील सर म्हणाले, “सेवेची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. खेडगाव ग्रामपंचायतीने दाखवलेल्या आपुलकीबद्दल मी ऋणी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.”


