एरंडोल मतदार संघातील SIR चे काम 100% पूर्ण; मतदान नोंदणी अधिकारी व BLO यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न…!
एरंडोल मतदार संघातील SIR चे काम 100% पूर्ण; मतदान नोंदणी अधिकारी व BLO यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न...!

उपसंपादक इमरान शेख
एरंडोल तालुका 16 एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदार यादीचा सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम `SIR` अंतर्गत नेमून दिलेले काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नायब तहसीलदार श्री. अमोल बनसंगायो आणि त्यांना नेमून दिलेल्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी मा. श्री. मनीषकुमार गायकवाड साहेब, उपविभागीय अधिकारी आणि *मा. श्री. गोपाळ पाटील साहेब, तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी सर्व 6 मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या तसेच BLO यांच्या कामाचे कौतुक केले आणि पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
घरोघरी भेटी, माहिती संकलन, नाव नोंदणी, दुरुस्ती आणि वगळणीची प्रक्रिया पारदर्शकपणे वेळेत पूर्ण केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाले. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी साठी संपर्क 9890816327



