एरंडोलमध्ये मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे – उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचे आवाहन…!
एरंडोलमध्ये मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे - उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचे आवाहन...!

इमरान शेख उपसंपादक
सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क एरंडोल
एरंडोल, दि. १ ऑक्टोबर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) – २०२६ अंतर्गत १६-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दि. ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
शिबिरात कोणती कामे होणार?
दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची फॉर्म नं. ६ द्वारे नवीन नोंदणी.
मयत, कायम स्थलांतरित आणि दुबार नोंदी वगळण्यासाठी फॉर्म नं. ७.
मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशिलात दुरुस्तीसाठी फॉर्म नं. ८.
महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम
एरंडोल आणि पारोळा तालुक्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये दि. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. १८ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची यावेळी नोंदणी केली जाणार आहे.
“एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये” या उद्देशाने हे शिबिरे आयोजित केली असून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे…



