जुगार अड्डयावर मेहुणबारे पोलीसांचा छापा; ५ जणांना पकडलं, १,२१,३५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चालणाऱ्या जुगार अड्डयावर शुक्रवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्या पथकाने धाड टाकली आहे. दहिवद फाट्याजवळील दहिवद गावाकडे जाणाऱ्या नाल्याच्या कडेला तिन पत्ती झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असलेल्या एकूण ५ जणांना पोलीसांनी पकडले असून एकूण १,२१,३५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध धंदे रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. दिवाळीत मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या दहिवद फाट्याजवळील दहिवद गावाकडे जाणाऱ्या नाल्याच्या कडेला तिन पत्ती झन्ना मन्ना नावाचा जुगार काही इसम खेळत असल्याची गुप्त माहिती मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांना मिळाली. तात्काळ पोलीसांनी छापा टाकून ५ जणांना पकडले असून २ जण पळून गेलेले असून त्यांना सुध्दा या ५ जणांमधून काही इसम पळून गेलेले इसमांना ओळखतात म्हणून असा एकूण ७ जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे पो.कॉ. विनोद बेलदार यांच्या फिर्याद वरून मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान रोख रक्कम व २ मोटर सायकल असा एकूण १,२१,३५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पो.हवा. देविदास पाटील, पो.ना. योगेश पाटील, पो.कॉ.विनोद बेलदार यांच्या पथकाने केली.