Breaking
ब्रेकिंग

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील तळई-उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू…!

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील तळई-उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू...!

1 1 4 9 8 6

इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क कासोदा

एरंडोल तालुक्यातील तळई – उत्राण रोडवर सावता मंदिरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी योगेश जगन्नाथ पाटील (वय ३९, रा.तळई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार –

त्यांचा लहान भाऊ विलास जगन्नाथ पाटील (वय ३६) हा दि. २३/१०/२०२६ रोजी रात्री ९.२९ वाजेच्या सुमारास आपली लाल रंगाची प्लॅटिना मोटरसायकल ने घरी जात असताना, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटी ने जोरदार धडक दिली.

ही इलेक्ट्रिक स्कुटी गावातीलच अशोक उत्तम निकम हे चालवत होते व त्यांच्या मागे चंद्रकांत भगवान तामस्वरे (दोन्ही रा.तळई) बसले होते.

धडकेत विलास पाटील हे जमिनीवर पडले व त्यांच्या नाकातून व डोक्यातून रक्त येऊन ते गंभीर जखमी झाले. गावातील लोकांच्या मदतीने त्यांना तात्काळ भडगाव येथील अंजली हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी रात्री १०.१५ वाजता त्यांना मयत घोषित केले.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, स्कुटीवरील चंद्रकांत तामस्वरे हे देखील जखमी झाले आहेत.

मयत विलास यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी , 1मुलगी  व 1मुलगा असा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 9 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे