कासोदा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी बालविवाह व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…!
कासोदा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी बालविवाह व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल...!

इमरान शेख उपसंपादक
कासोदा येथे दि. 20/08/2026 अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा पोलिस ठाणे येथे गु.रं. 126/2026 हा गुन्हा दि. 19/08/2026 रोजी रात्री 11:37 वाजता नोंदविण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1) व 3(5), पोक्सो कायदा 2012 चे कलम 4(1), 4(2), 6(1)तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10 व 11अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे?
पोलिस उपनिरीक्षक शारदा गोकुळ भावरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 12/08/2026 रोजी धुळे शहर पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात माहिती मिळाली.
तपासात समोर आले की, 15 वर्ष 11 महिने वयाची असलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या संगनमताने विवाहित आहे. दि. 06/08/2026 रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिला.
तपासात पुढे निष्पन्न झाले की, मुलीचा विवाह दि. 20/06/2025 रोजी करण्यात आला होता. विवाहाच्या वेळी ती अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या व तिच्या पतीच्या कुटुंबियांना असतानाही त्यांनी हा विवाह लावला. विवाहानंतर आरोपी पतीने तिच्यावर लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यातून ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिने नवजात बालकाला जन्म दिला.
पुढील कारवाई..
या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या सहभागी असलेल्या मुलीचे पालक, सासरे, सासू तसेच इतर पितृडींच्या विरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे..



