ब्रेकिंग | कासोद्यात शेतकऱ्यावर आभाळ कोसळले! 80 हजारांचा कापूस-चारा आगीत भस्मसात…!
ब्रेकिंग | कासोद्यात शेतकऱ्यावर आभाळ कोसळले! 80 हजारांचा कापूस-चारा आगीत भस्मसात...!

इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क
कासोदा (एरंडोल): आधीच दुष्काळाच्या झळांनी हतबल झालेल्या बळीराजाच्या संसारावर आगीने घाला घातला आहे. कासोदा शिवारात पत्री शेडला अकस्मात आग लागून 80 हजारांचे नुकसान झाले आहे.
काय घडलं?
शेतकरी अभिमन सुकदेव चव्हाण (वय 42, गट नं. 422) यांनी शेतातील पत्री शेडमध्ये वर्षभरासाठी गुरांचा ज्वारी-मका चारा आणि विक्रीसाठीचा 4 क्विंटल (11 गोण्या) कापूस ठेवला होता.
दि. 16 ऑक्टोबर रात्री 9 ते 17 ऑक्टोबर पहाटे 5 च्या दरम्यान शेडने अचानक पेट घेतला. सकाळी 5 वाजता मुलगा जितेंद्रसह दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना धूर दिसला. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
नुकसान:
– गुरांचा चारा – 50,000 रु.
– 11 गोण्या कापूस – 30,000 रु.
– एकूण – 80,000 रु.
शेजारी हिम्मत पाटील, अशोक क्षीरसागर यांच्या मदतीने आग विझवली, पण सर्व जळून खाक झाले होते.
ऐन दिवाळीत चारा आणि कापूस जळाल्याने चव्हाण कुटुंब उघड्यावर आले आहे. प्रशासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी कासोदा पोलीसात अकस्मात आग नोंद झाली असून तपास हे.कॉ. राकेश खोंडे करत आहेत..


