Breaking
ब्रेकिंग

पाचोऱ्यात SBI चे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न फसला पाचोरा पोलिसांच्या तत्परतेमुळे लाखो रुपये सुरक्षित…!

पाचोऱ्यात SBI चे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न फसला पाचोरा पोलिसांच्या तत्परतेमुळे लाखो रुपये सुरक्षित...!

1 0 2 2 0 0

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात गोंदेगाव रोड  जरगाव जवळील सारोळा रस्त्यावर भल्या पहाटे गॅस कटरच्या साहाय्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ATM फोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..

पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला असून, लाखो रुपयांची रोख रक्कम चोरी होण्यापासून सुरक्षित राहिली आहे

काय घडली घटना?

पाचोरा तालुक्यातील जरगाव जवळील सारोळा रस्त्यावर मध्यरात्री ३:३० च्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापली मशीनमधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट बाहेर काढून ते एका काळ्या रंगाच्या क्रेटा कारमध्ये भरण्याच्या तयारीत असतानाच, हवालदार हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धडक दिली

पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलागघटनास्थळी पोलिसांची एन्ट्री होताच तीन संशयित आरोपींनी कारमध्ये बसून तारखेडा मार्गे धूम ठोकली

पाचोरा पोलिसांनी अत्यंत धाडसाने चोरट्यांचा धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला मात्र, अंधार आणि वेगवान हालचालींचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले

पोलिसांकडून शोधकार्य सुरूघटना अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी तातडीने जळगाव, धुळे व मध्य प्रदेशातील सर्व टोल नाक्यांवर व नियंत्रण कक्षाला सतर्क केले आहे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाचोरा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरारी चोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पाचोरा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 2 2 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे