भडगाव येथे प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इमरान अली यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन…!
भडगाव येथे प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इमरान अली यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन...!

भडगाव शहरातील, दिनांक०९मे रोजी प्रभाग क्रमांक ३ येथील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी अधिक सोयीस्कर ठिकाण मिळावे, या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ चे नवनिर्वाचित नगरसेवक व आरोग्य सभापती मा. इमरान अली सय्यद यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी, भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येणार आहे याप्रसंगी बोलताना नगरसेवका इमरान अली सय्यद म्हणाले की, “हे कार्यालय केवळ माझे ऑफिस नसून, ते या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणाचे केंद्र असेल. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी हे कार्यालय २४x७ उपलब्ध राहील.”या उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिक, पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे कार्यालयाचा पत्ता:
जामा मस्जिद जिल्हा परिषद उर्दू शाळा जवळ भडगाव
प्रभाग क्रमांक,३भडगाव शहर नागरिकांसाठी आवाहन:परिसरातील पाणी समस्या, रस्ते, स्वच्छता, किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय कामांसाठी नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक इमरान अली सय्यद यांच्या वतीने करण्यात आले आहे…



