Breaking
ब्रेकिंग

एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत गंभीर दखल! जिल्हा परिषद प्रशासनाचे BDO ना चौकशीचे आदेश..!

एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत गंभीर दखल! जिल्हा परिषद प्रशासनाचे BDO ना चौकशीचे आदेश..!

0 9 5 0 1 0

एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नियमांचे उल्लंघन, आर्थिक अनियमितता आणि विकासकामांमध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत, जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. संबंधित एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कामकाजाची तातडीने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) दिले आहेत. नेमके प्रकरण काय? ग्रामपंचायतीमधील कामात मोठ्या प्रमाणात अनियमतता झाल्याची तक्रार स्थानिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांनी  जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती आरोप करण्यात. आळे होते आता एरंडोल तालुक्यातील  ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची दखल घेत जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार

अर्ज मध्ये सविस्तर नमूद

एरंडोल तालुक्यातील मागासवर्गीय यांच्या 15% निधीच्या विनियोग न करणा-या ग्रामपंचायतीची चौकशी करणे बाबत….

संदर्भ :- श्री. प्रविण सुकदेव बाविस्कर तालुका अध्यक्ष ता. एरंडोल जि. जळगांव यांचा तक्रारी अर्ज दि. 05/03/2026 कार्या. प्राप्त दि. 17/03/2025

उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, श्री. प्रविण सुकदेव बाविस्कर तालुका अध्यक्ष ता. एरंडोल जि. जळगांव यांनी शासकीय नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्वनिधीतील 15% खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र एरंडोल तालुक्यातील कासोदा सह अनेक ग्रामपंचायतीनी सन 2023-2024 आणि 2025 या सलग 3 आर्थिक वर्षात ही निधी खर्च केला नाही. स्थानिक सदस्य आणि ग्रामस्थांनी वारंवार लेखी पाठपुरावा करुन ही सरपंच व ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा निधी लॅप्स झाला आहे याबाबतचे निवेदन या कार्यालयास सादर केले आहे.

सदरचा तक्रारी अर्ज यासोबत आपले कार्यालयाकडेस पुढील कार्यवाहीसाठी हस्तांतरीत करण्यात येत असुन ग्रामपंचायतीने आपल्या स्वनिधीतील 15% मागासवर्गीय खर्च हा कायदयाच्या तरतुदीनुसार अनुशेष करावा व केलेल्या खर्चचा अहवाल तक्रारदार यांना परस्पर आपल्या कार्यालयामार्फत कळवुन तसा अहवाल उलट टपाली या कार्यालयात विनाविलंब सादर करावा.

प्रत :- श्री. प्रविण सुकदेव बाविस्कर तालुका अध्यक्ष ता. एरंडोल जि. जळगाव यांना माहितीसाठी रवाना

2/- आपला अर्ज पंचायत समिती एरंडोल या कार्यालयाशी संबंधीत असल्याने सदरचे अर्जावर चौकशी Pथ२न ४:४श्यक कार्यवाहीसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांचेकडेस वर्ग करणेत आला

तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांची प्रतिक्रिया “आम्ही अनेक दिवसांपासून या अनियमिततेबाबत तक्रारी करत होतो. अखेर जिल्हा परिषदेने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत, आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया  दिली आहे..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे