Breaking
ब्रेकिंग

श्री गणेशोत्सवात कासोदा पोलिसांची धडक कारवाई; सपोनि श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे यांची दमदार कामगिरी…!

श्री गणेशोत्सवात कासोदा पोलिसांची धडक कारवाई; सपोनि श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे यांची दमदार कामगिरी...!

1 1 2 3 3 0

श्री गणेशोत्सवात कासोदा पोलिसांची धड

सत्यकाम न्यूज नेटवर्क कासोदा :-इमरान शेख उपसंपादक

श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कासोदा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे.

प्रभारी सपोनि श्रीकांत  पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. १४/०९/२०२६ रोजी कासोदा गावातील बिजली शहा चौक परिसरात एक इसम गांजाचे सेवन करत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून *पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे* व स्टाफने छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले.

सदर प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४२/२०२६ NDPS Act कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवासारख्या पवित्र काळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अवैध धंदे व अमली पदार्थांविरोधात ही मोहीम उघडण्यात आली असून, या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

यापुढेही कासोदा हद्दीत गांजा, दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सपोनि श्रीकांत पाटील यांनी दिला आहे.

पोलिसांचा तरुणांना संदेश  “गांजा, चरस सारख्या अमली पदार्थांपासून दूर रहा. हे व्यसन तुमचे शरीर, भविष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त करते. आपली ऊर्जा शिक्षण, खेळ आणि चांगल्या कामात लावा.

या कारवाईमुळे नागरिकांमधून सपोनि श्रीकांत पाटील व हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे