भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…!
भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन...!

जिल्हा प्रतिनिधी :-कलीम सय्यद
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे कै. राजू दादा देशमुख, माजी आमदार, चाळीसगाव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समर्थ शशिकांत साळुंखे मित्र मंडळ, खेडगाव व मारवाडी युवा मंच, चाळीसगाव आणि रोटरी आय हॉस्पिटल, मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचा तपशील –
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२६, गुरुवार
वेळ : सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
स्थळ : खेडगाव येथे
या शिबिरात अनुभवी डॉक्टरांकडून डोळ्यांची मोफत तपासणी केली जाणार असून, गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून चष्मे व औषधे वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिराचे आयोजक शशिकांत साळुंखे असून, हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
तरी परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक : शशिकांत साळुंखे
समर्थ मित्र मंडळ, खेडगाव


