भडगाव शहरातील न्यु. मिलन चहाच्या हॉटेलमध्ये डी- फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा भिषण स्फोट; १२जण जखमी, !!
भडगाव शहरातील न्यु. मिलन चहाच्या हॉटेलमध्ये डी- फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा भिषण स्फोट; १२जण जखमी, !!

भडगांव प्रतिनिधी :-
भडगावं: भडगावं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) वरील न्यू मिलन चहाच्या हॉटेल मधील डी- फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल चालकाच्या मुलासह 12 नागरीक चहा पिण्यासाठी बसलेले होते ते सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करुन पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले असल्याची माहिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी सांगितले. यातील काही जखमींना समर्पण हॉस्पिटल काही जखमींवर पाचोरा येथील खासगी व पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तर काहींना बापूजी फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून धुळे, जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल न्यु मिलन टी हाऊस येथे दुपारी 1. 30 वाजे सुमारास डी फ्रीजच्या कॉम्प्रेसर चा स्फोट होऊन हॉटेल मालकाच्या मुलासह नऊ ते दहा नागरिक जखमी जखमी झाले. दुपारची वेळ असल्याने गर्दीचा ओघ कमी होता. घटना सकाळी किंवा संध्याकाळी राहिली असती तर मोठा अनर्थ झाला असता. असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींवर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल पाचोरा येथे उपचार सुरु असून हॉटेल चालक यांचा मुलगा सोहिल मणियार याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. यात कर्नाटक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यावेळी या घटनेमध्ये हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल शेख रफिक मणियार वय- 28 वर्ष (ग्रीन पार्क कॉलणी भडगाव),
सोहिल शेख रफिक (वय 28)- ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, शेख रफिक शेख रज्जाक (वय 50)-ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, इकबाल शेख गाणी (वय 40)- गंजी वाडा, भडगाव,
सोहिल शेख रफिक (वय 28)- ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, शेख रफिक शेख रज्जाक (वय 50)-ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, इकबाल शेख गाणी (वय 40)- गंजी वाडा, भडगाव,
एजाजोद्दीन रियाजद्दीन मुल्ला (वय 32)- जालाली मोहल्ला, भडगाव, मोहसीन शेख शब्बीर (वय 33)- ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, दिलीप भाटा ठाकरे (वय 60)-साई नगर, भडगाव, भूषण प्रकाश पाटील (वय 34)-जुवार्डी, ता. भडगाव,
रवींद्र मुकुंदराव सोनवणे (वय 56)- बाळद रोड, भडगाव, राजकुमार मोतीराम पवार (वय 28)- मुदळ, ता. मुदळ, जि. बिजर (कर्नाटक), मयूर पदमसिंग पाटील (वय 28)- वडधे, ता. भडगाव, राहुल बाप्पु पाटील (वय 40)- जामदे, ता. चाळीसगाव, अमोल गोविंद शिंदे (वय 34)- वळूज, ता. खातव, जि. सातारा, गजानन दिगंबर उजेड (वय 28)- पोकळ वडगाव, ता. जालना
जखमी झाले. या जखमींवर भडगाव, पाचोरा, जळगाव, धुळे, येथे उपचार सुरु असून यात जीवित हानी झालेली नाही सदर घटनेची माहिती मिळताच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठत जखमींना पुढील उपचारासाठी मदत केली. यावेळी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व मित्र परिवारांनी गर्दी केली होती. यावेळी बापूजी फाउंडेशन रुग्णवाहिका चालक, भैय्या पाटील, मनोज पाटील, गोलू शिंदे, सागर पाटील, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त बजावला.