
उपसंपादक – कल्पेश महाले
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी नवी दिल्ली येथे खासदार स्मिताताई वाघ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व शुभाशीर्वाद प्रदान केले.
या विशेष प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांचा संपूर्ण परिवार देखील उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार वाघ यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम यश मिळावे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनीही खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्यशक्तीचे आणि जनसंपर्कातील कौशल्याचे कौतुक केले व त्यांना पुढील राजकीय कारकीर्दीत उत्तुंग यश मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
हा सन्मान आणि शुभेच्छांचा क्षण खासदार वाघ आणि त्यांच्या परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. या शुभेच्छांमुळे खासदार वाघ यांच्या कार्यास अधिक ऊर्जा प्राप्त झाली असून, त्या जनसेवेच्या कार्यात अधिक जोमाने काम करण्यास तत्पर असल्याचे सांगितले.