पिंपळगाव हरेश्वर येथे जि.प. उर्दू शाळात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…!
पिंपळगाव हरेश्वर येथे जि.प. उर्दू शाळात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न...!

इमरान शेख उपसंपादक
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, येथे दि. १८ ऑगस्ट रोयी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जि.प. उर्दू शाळा, पिंपळगाव हरेश्वर येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग घेत रोपांच्या संगोपनाचा संकल्प केला.
अब्दुल करीम सर यांचे मोलाचे योगदान या वृक्षारोपणासाठी लागणारी सर्व रोपे शाळेचे पदवीधर शिक्षक मा. अब्दुल करीम सर यांनी स्वखर्चाने भेट म्हणून दिली. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या या योगदानाबद्दल शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांच्या वतीने त्यांचा मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करून “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा”असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली.
या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवाईने नटणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले…



