सातव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन धूमधडाक्यात. कासोदा शहरात ..!
सातव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन धूमधडाक्यात. कासोदा शहरात ..!

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी :- इमरान शेख
एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही कासोदा येथे सात दिवसाला श्री.गणरायाला विसर्जन
दि.२ सप्टेंबर मंगळवार रोजी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. येथे सात दिवसाला श्री विसर्जनाची हि परंपरा अखंडित चालत आली आहे. तलाव, विहिरी या ठिकाणी श्री गणेशमूर्तीचे थाटात विसर्जन करण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत विसर्जनासाठी भाविकांनी विसर्जनस्थळी गर्दी केली होती.
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ असे म्हणत भाविकांनी गणेश मिरवणूक काढली. पारंपरिक उत्सव परंपरा असल्याने येथिल लहान मोठे घरगुती व मंडळांच्या गणपतीची संध्याकाळी ६ वाजता आरती करून वाहनातून गावांच्या प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढत श्रींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी गावातील शिवराय मित्र मंडळ, कुस्तीगीर महासंघ बजरंग गृप , शिवनेरी मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, विरसावरकर मित्र मंडळ, रामराज्य गृप, सियाराम मित्र मंडळ, एस टी डी ग्रुपचा राजा मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, सार्वजनिक मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, सम्राट मित्र मंडळ, शिवगर्जना, समता मित्र मंडळ, शिव साधना मंडळ असे आदी मंडळ मिरवणुकीत सहभागी होते.
रात्री १२ वाजता शेवटच्या बाप्पाचे विसर्जन होऊन बँड बंद झालेत. मिरवणुकिला गालबोट न लागता शांततेत श्री विसर्जन निर्विघ्न पार पडले.
यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो. नि.निलेश राजपूत, पि.एस.आय. धर्मराज पाटील, पो.कॉ. नितिन सुर्यवंशी, समाधान तोंडे, योगेश पाटील, लहू हटकर, योगेश पाटील, निलेश गायकवाड, राकेश खोंडे, श्रीकांत गायकवाड, नरेंद्र गजरे, नरेंद्र पाटील, कुणाल देवरे यांच्यासह पोलिस मुख्यालय जळगाव, शहर वाहतूक शाखा जळगाव , पारोळा, एरंडोल, भडगाव, मेहुणबारे, चाळीसगाव शहर, ग्रामीण आदींसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच महाविजवितरण कंपनीचे अभियंता व त्यांचे कर्मचारी देखील उपस्थीत होते.
स.पो.नि.निलेश राजपूत स्वतः शेवटपर्यंत मिरवणुक शांततेत पार पडावी म्हणुन गस्त ठेऊन होते.