कासोदा पोलिसांचे निपाणे येथे जुगार अड्यावर छापा; अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरूच…!
कासोदा पोलिसांचे निपाणे येथे जुगार अड्यावर छापा; अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरूच...!

निपाणे ता. एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस
स्टेशन हद्दीत असलेल्या निपाणे गावी ग्रामपंचायत शेजारी मंगल कार्यालयाच्या आडोशाला जमिनीवर खाली घोळका करून काही जुगारी मिळून पत्यांचा खेळ-खेळत असल्याची गुप्त बातमी कासोदा पोस्टचे सपोनी. निलेश राजपूत यांना दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजता मिळाली असता.
त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आपल्या सहकाऱ्यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक रवाना केले.
सदर पथकास मिळालेल्या माहितीनुसार तेथे काही जुगारी पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचे दिसून आले. पंचा समक्षखात्री होत धाड टाकली असता, त्या धाडीत ८ जुगारी मिळून आले, त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी कैलास तुकाराम पाटील, प्रमोद बाळकृष्ण बियाणी, मनोज शालिक महाजन, गोपीचंद नाना पाटील, वाल्मीक नारायण पाटील, संभाजी दरवेश पाटील, दीपक लक्ष्मण माळी, सुरेश लक्ष्मण भिल सर्व राहणार निपाणे तालुका एरंडोल असे सांगितले. तसेच वरील लोकांनी सांगितले की आमच्या सोबत जुगाराचा खेळ खेळत असलेला विजय माणिक पाटील हा सदर ठिकाणी छापा टाकताच पळून गेला. त्यांच्या अंग झडतीत एकूण २७००रु. इतकी रोख रक्कम मिळून आली. या सर्वांना कासोदा पोलीस स्टेशनला आणत पो.कॉ. समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जमा करण्यात आलले आहे.
या घटनेचा पुढील तपास स.पो.नी. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नी. रामकृष्ण पाटील हे करीत आहे.
ही कारवाई स.पो.नी.निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सूर्यवंशी, समाधान तोंडे, निलेश गायकवाड यांच्या पाथकाने केली आहे.