किशोर पाटील यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती..!
किशोर पाटील यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती..!

इमरान शेख उपसंपादक
सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क एरंडोल
एरंडोल | अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी
एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल दादा देसले आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी दिनांक ०१/१०/२०२६ पासून पुढील आदेशापर्यंत असणार आहे.
या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, हे पद अस्थायी स्वरूपाचे असून कार्य समाधानकारक नसेल तर पद रद्द करण्याचा अधिकार संघटनेला राहील. तसेच यापुढे सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किशोर पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे..



