जश्ने ईद मिलाद-उन-नबीनिमित्त भडगावं शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा
जश्ने ईद मिलाद-उन-नबीनिमित्त भडगावं शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा

भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरात पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जन्मदिनानिमित्त जशन-ए-ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
सकाळी नाते-शरीफ पठण व दुआ कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात झाली. दुपारनंतर शहरातील तोंडगाव, यशवंतनगर, जलाली मोहल्ला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या झेंड्यांसह नाते पठण, धार्मिक घोषणाबाजी तसेच लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
शहरातील प्रमुख मार्ग चाळीसगाव, पारोळा चौकफुल्ली आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. विविध ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांकडून शरबत, फळे व लंगर तबर्रुक नियाज, हलवा, आणि लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा आस्वादाचा आनंद सर्व मुस्लिम नागरिकांनी घेतला.
या प्रसंगी मान्यवरांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातून शांतता, बंधुता व मानवतेचा संदेश समाजात रुजविण्याचे आवाहन केले. संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन ऐक्य, प्रेम व भाईचाऱ्याचा संदेश झळकला.



