एरंडोल तालुक्यात ईएफ फॉर्म डिजिटायझेशनला वेग BLO अभिमान विसावे यांचा गौरव, पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सन्मान…!
एरंडोल तालुक्यात ईएफ फॉर्म डिजिटायझेशनला वेग BLO अभिमान विसावे यांचा गौरव, पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सन्मान...!

सत्यकाम न्यूज उपसंपादक :-इमरान शेख
एरंडोल मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ईएफ (Enumeration Form) डिजिटायझेशन मोहिमेत एरंडोल तालुक्याने आघाडी घेतली आहे.
तालुक्यातील BLO क्र. 202 श्री. अभिमान विसावे यांनी निर्धारित मुदतीपूर्वीच 100 टक्के ईएफ फॉर्म डिजिटायझेशनचे काम पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मान. श्री. मनीष कुमार गायकवाड, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एरंडोल विभाग आणि मान. श्री. गोपाळ पाटील, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, एरंडोल यांनी त्यांचा विशेष गौरव करून अभिनंदन केले.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ईएफ फॉर्म डिजिटायझेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक BLO ला निश्चित कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत श्री. विसावे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून मुदतीपूर्वीच उद्दिष्ट गाठल्याने त्यांची कामगिरी संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
पर्यवेक्षक अधिकाऱ्यांचाही सन्मान
या मोहिमेदरम्यान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. अमोल बन यांनी केलेले प्रभावी पर्यवेक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि नियमित आढावा याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला गती मिळाल्याचे सांगण्यात आले.
तसेच पर्यवेक्षक श्री. नदीम शेख यांनीही BLO यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून कामाचा पाठपुरावा केला आणि अडचणी सोडविल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला.
सर्व BLO ला सूचना
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्री. अभिमान विसावे यांची कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण प्रशासनासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत तालुक्यातील सर्व BLO यांनी प्रलंबित ईएफ फॉर्म डिजिटायझेशनचे काम पुढील दोन दिवसांत शंभर टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
मतदार यादीची गुणवत्ता वाढविणे, प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळे आणि BLO यांच्या प्रतिसादामुळे एरंडोल तालुक्यात ईएफ फॉर्म डिजिटायझेशन मोहिमेला वेग आला असून उर्वरित कामही मुदतीत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बातमी साठी संपर्क :-9890816327
इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज



