एरंडोल शहरात सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाकडून तृतीय पंथीयांना प्रत्यक्ष भेट देऊन योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न..!
एरंडोल शहरात सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाकडून तृतीय पंथीयांना प्रत्यक्ष भेट देऊन योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न..!

एरंडोल प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
शासनाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शहरात सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात आला. दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासनाने शहरातील तृतीय पंथीय समाजातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या व्यवसाय ठिकाणी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांना विविध शासन योजनांबाबत माहिती देण्यात आली. संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आवश्यक माहिती पुरविण्याची विनंती प्रशासनाने केली. शासन योजनांचा थेट लाभ मिळण्यास यामुळे मदत होत असल्याचे तृतीय पंथीयांनी नमूद करत प्रशासनाचे आभार मानले.
याबाबतचे संपूर्ण कामकाज नायब तहसीलदार अमोल बन यांच्या देखरेखीखाली पार पडले. त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी अयाज शेख, महसूल सहाय्यक विजय कोळी व विशाल सोनवणे यांनी सक्रिय सहकार्य केले.
सेवा पंधरवडा कार्यक्रमामुळे शासन–प्रशासनाचा संपर्क अधिक दृढ होत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.
तसेच सामाजिक व आर्थिक योजनांबाबत कोणालाही काही अडचण निर्माण झाल्यास श्री. अमोल बन (नायब तहसीलदार – संजय गांधी योजना) यांना 8788665959 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.