भडगावात नगरसेवक इमरान अली सय्यद नागरिकांच्या भेटीला, माझा प्रभाग, माझी जबाबदारी” अभियानाला सुरुवात…!
भडगावात नगरसेवक इमरान अली सय्यद नागरिकांच्या भेटीला, माझा प्रभाग, माझी जबाबदारी" अभियानाला सुरुवात...!

इमरान शेख उपसंपादक
भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद
भडगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने भडगाव
नगरपरिषदेने माझा प्रभाग, माझी जबाबदारी ही स्वच्छ आणि सुंदर प्रभाग अभियान व जनसंपर्काची सुरुवात केली आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभागांमध्ये१२ प्रत्यक्ष पायपीट करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.
अभियानात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, गटनेते तसेच संबंधित प्रभागातील नगरसेवक आसिम मिर्झा सहभागी होत आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, पदपथ, सार्वजनिक आरोग्य आदी नागरिक सुविधांबाबतच्या तक्रारी नोंदवून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. अभियानाचा प्रारंभ प्रभाग क्रमांक 3 मधून झाला. अन्य प्रभागांमध्येही ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार
यावेळी नगरसेवक आरोग्य व स्वच्छता सभापती इमरान अली सैयद यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे.
प्रभागांमध्ये १२ मोहीम राबविण्यात येणार
टप्प्याटप्प्याने सर्वच्या सर्व म्हणजे प्रभागांमध्य १२”माझा प्रभाग, माझी जबाबदारी”_ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पाहणी दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी वर्गीकरण करून संबंधित विभागाकडून तातडीने कार्यवाहीही करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


