उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांच्या दालनात १७ – चाळीसगांव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्री.ब्रजेश कुमार (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता मतदान यंत्र व व्ही.व्ही.पॅटची सरमिसळ तहसिल कार्यालय, चाळीसगाव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे करण्यात आली.
सदर बैठकीसाठी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. सदर बैठकीस महायुती व महविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रतिनिधींसह अपक्ष उमेदवार सुनिल ताराचंद मोरे, राहूल गरुड, दिलीप मोरे हे उपस्थित होते. सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार चाळीसगांव श्री.प्रशांत पाटील यांनी सदर सरमिसळ पध्दतीबाबत उपस्थित सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांना संपूर्ण प्रक्रिया समजावुन सांगितली. १७-चाळीसगांव विधानसभा मतदार संघाकरिता एकूण मतदान केंद्राची संख्या ३४४ असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून बी.यु. ४१२, सी.यु. ४१२ व व्ही.व्ही.पॅट ४४७ प्राप्त झालेले असून ३४४ मतदान केंद्रासाठी बी.यु., सी.यु. व व्ही.व्ही.पॅट निश्चित झाल्यानंतर उर्वरित ६८ बी.यु., ६८ सी.यु. व १०३ व्ही.व्ही.पॅट हे राखीव राहतील असे सर्वाना सुचित केले.
यानंतर मतदान यंत्र व व्ही.व्ही.पॅट चे सरमिसळ यादी (EVM & VVPAT Second Randomization) संगणकीकृत प्रणालीवर पुर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावर पाठविण्यासाठी निश्चित झालेल्या मतदान यंत्र व व्ही.व्ही.पॅट मतदान केंद्र निहाय यांची क्रमांकानुसार यादी सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांना देण्यात आली यावेळी दिनांक १२/११/२०२४ व १३/११/२०२४ या दोन दिवसात व्ही.व्ही.पॅट मध्ये उमेदवारांचे चिन्ह अपलोड करण्याची प्रक्रिया मा.भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत ई.व्ही.एम. अभियंत्यामार्फत केली जाणार असून दिनांक १४/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजे पासून सभागृह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणी EVM Commissioning (EVM तयार करणे) ही प्रक्रिया उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याची माहिती उपस्थित सर्व उमेदवार व प्रतिनिधींना देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.