
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – चाळीसगांव आगाराची चाळीसगांव ते मालेगांव जाणारी बस क्रमांक MH 14 BT 2338 एस.टी. बसचा मालेगांवकडे जातांना आज दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:00 वाजेच्या सुमारास बिलाखेड गावाजवळ बस व मालेगाव वरुन चाळीसगांवच्या दिशेने येणारी हिरो होंडा कंपनीची सी डी डॉन मोटार सायकल गाडी नं MH 15 BM 6570 या गाडीवर मामा व भाच्याचा अपघात झाला असुन या अपघातात मोटार सायकल वरील मामा सलीम शरीफ शेख, वय-35 वर्ष, रा.पिंपरखेड ता.चाळीसगांव हे जागीच ठार झाले तर दुसरा त्यांचा भाचा अरबाज रफिक शेख, वय-25 वर्ष, रा.मालेगाव हा गंभीर जखमी झाला असून त्याला चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मंदार करंबेळकर यांनी सांगितले. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश माळी व त्यांचे सहकारी यांनी धाव घेऊन मदत कार्य केले.