Breaking
ब्रेकिंग

कासोद्यातील परमपूज्य श्री सदगुरू गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची 73वी वर्षासाठी नवी कार्यकारणी जाहीर…!

कासोद्यातील परमपूज्य श्री सदगुरू गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची 73वी वर्षासाठी नवी कार्यकारणी जाहीर...!

1 0 9 6 8 8

इमरान शेख उपसंपादक

कसोदा गावची ओळख असलेल्या परमपूज्य श्री सदगुरू गोविंद महाराज अखंड हरिनाम सप्ताह 2026 च्या 73व्या  वर्षासाठी नवी कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली आहे.

गावातील मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत भाविकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

नवीन कार्यकारणी

अध्यक्ष नंदू भाऊ खैरनार

उपाध्यक्ष शैलेश भाऊ मंत्री,

उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ बाविस्कर

सचिव राकेश भाऊ जाधव,

सचिव शैलेश भाऊ पांडे

खजिनदार देवचंद भाऊ जाधव

नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, “सप्ताह हा केवळ कार्यक्रम नसून गावाची परंपरा आहे. यंदा कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन आणि महाप्रसादाचे नियोजन अधिक भक्तिभावाने केले जाईल. सर्व भाविकांनी आणि दानशूरांनी सहकार्य करावे.

कासोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहाला मागील 72 वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार सह  हा सप्ताह महाराष्ट्रातील दोन नंबर वर येतो आजूबाजूच्या कासोदा पंचक्रोशीतील या सप्ताहासाठी भाविक येतात. 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहात अखंड नामस्मरण, कीर्तनकारांचे प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 9 6 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे