Breaking
ब्रेकिंग

भडगाव योजना ताई पाटील यांच्या हस्ते शीत शवपेटीचे लोकार्पण; सामाजिक बांधिलकीचा आदर्श…!

भडगाव योजना ताई पाटील यांच्या हस्ते शीत शवपेटीचे लोकार्पण; सामाजिक बांधिलकीचा आदर्श...!

1 1 2 8 9 1

सत्यकाम न्यूज नेटवर्क भडगाव / पाचोरा

इमरान शेख उपसंपादक डिजिटल मीडिया

सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव जपत ओझर-अंतुर्ली विकास सोसायटीत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

भडगाव शेतकरी संघाच्या संचालिका मंडळ अध्यक्षा तथा मा. सभापती नगरसेविका मा. योजना ताई पाटील यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानांतर्गत शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

सामान्य कुटुंबाला अंत्यसंस्काराप्रसंगी नातेवाईकांची वाट पाहण्यासाठी शीत शवपेटीची नितांत गरज असते. हीच गरज ओळखून योजना पाटील यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी चेअरमन आनंदराव पाटील, संचालक डी. डी. पाटील, माजी नगरसेवक डॉ. भरत पाटील, मुख्याध्यापक सोमनाथ पाटील, प्रशांत पाटील, अशोकगीर गोसावी, सुनील पाटील, अजबराव पाटील, हेमराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या पाटील, सचिव प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी योजनाताई पाटील यांच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 8 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे