Breaking
ब्रेकिंग

कासोदा येथील उर्स महोत्सवास आमदार अमोलदादा पाटील यांची सदिच्छा भेट: सर्वधर्मसमभावाचा दिला संदेश…!

कासोदा येथील उर्स महोत्सवास आमदार अमोलदादा पाटील यांची सदिच्छा भेट: सर्वधर्मसमभावाचा दिला संदेश...!

1 0 3 9 1 5

कासोदा शहरातील हजरत सादिक शाह बाबा व हजरत बिजली शाह बाबा चा आयोजित करण्यात आलेल्या भव्य उर्स महोत्सवास एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघाचे आमदार अमोलदादा पाटील यांनी नुकतीच आवर्जून सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी दर्गा येथे उपस्थित राहून चादर चढवली आणि देशाच्या व राज्याच्या शांततेसाठी व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या भेटीदरम्यान आमदार अमोलदादा पाटील यांनी उर्स महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वधर्मीय बांधवांशी संवाद साधला. हा उत्सव आपल्या भागातील ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचे उत्तम प्रतीक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या सदिच्छा भेटीच्या वेळी परिसरातील विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि उर्स कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध जाती-धर्मांचे सण-उत्सव आपण नेहमीच आनंदाने आणि परस्परांच्या आदराने साजरे करतो, हीच महाराष्ट्राची महान परंपरा असून ती पुढेही अशीच जपली पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश आमदार अमोल दादा पाटील यांनी उपस्थितांना दिला..

य महोत्सवात आमदार अमोलदादा पाटील यांचे अयोजकांच्या वतीने स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा परिसरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे उत्तम प्रतीक मानला जातो. याप्रसंगी परिसरातील नागरिक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 3 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे