Breaking
ब्रेकिंग

पाचोरा उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न…!

पाचोरा उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न...!

1 0 1 0 4 6

भडगाव प्रतिनिधी :–हय्युम अली सैय्यद

पाचोरा शहर येथे  उपविभागीय अधिकारी कार्यालय, मध्ये दिनांक: ११ जून, २०२६ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक विविध विभागांना महत्त्वपूर्ण निर्देश

पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाचोरा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय शासकीय विभागांच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्यासोबतच जनहितार्थ योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रमुख प्रशासकीय निर्णय व निर्देश:

परिवहन विभाग/प्रशासकीय शिस्त: कामात कसूर आणि विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या भडगाव व पाचोरा येथील चालकांवर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. निकामी शासकीय वाहनांचा तातडीने लिलाव करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आले

सार्वजनिक बांधकाम व पायाभूत सुविधा: भडगाव येथील इमारतीचे संपूर्ण बांधकाम पाडण्याऐवजी आवश्यक तेवढीच सुधारणा करून नवीन नकाशा सादर करण्यास सांगितले. भडगाव येथील जिल्हा रुग्णालय जागा प्रश्न आणि विकास आराखड्यातील रस्त्यांबाबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

कृषी व आरोग्य सक्षमीकरण: कृषी योजनांचे प्रलंबित २७९ अर्ज त्वरित निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. खडकदेवळा उपकेंद्राच्या नवीन इमारतीला वीजपुरवठा करणे, रिक्त पदे भरणे आणि आरोग्य केंद्राच्या प्रस्तावाला गती देण्याबाबत चर्चा झाली.

शिक्षण विभाग सज्जता: आगामी १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांची पूर्वतयारी म्हणून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या-पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आणि शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना राबविणे, पूरग्रस्तांसाठी निधीचा पाठपुरावा करणे आणि अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 1 0 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे