पिंपळगाव हरे येथे जि. प. उर्दू शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, SMC अध्यक्ष तालिब कुतुबुद्दीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण…!
पिंपळगाव हरे येथे जि. प. उर्दू शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, SMC अध्यक्ष तालिब कुतुबुद्दीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण...!

इमरान शेख उपसंपादक
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे,येथे दि.15ऑगस्ट रोजी देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन पिंपळगाव हरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात SMC अध्यक्ष तालिब कुतुबुद्दीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांचे मनोगत
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक हाफिज वसीम खान सर आणि SMC अध्यक्ष तालिब शेख* यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यासातून देशासाठी चांगले नागरिक बनावे, असे आवाहन केले.
समिती व शिक्षकांचे आभार..
यावेळी शाळा समिती व सर्व शिक्षकांचे आभार मानण्यात आले. तसेच पिंपळगाव हरे येथील सर्व तरुण मित्र व पालकांनी* मुलांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल समिती आणि शिक्षकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
जय हिंद! जय भारत!!



