जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र
कजगाव येथील पत्रकार कुटुंबावर हल्ला प्रकरणी व्हॉईस ऑफ मीडियाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
0
6
1
1
8
0
संपादक – राजेंद्र न्हावी
चाळीसगाव – दिव्य मराठी या वृत्तपत्राचे भडगाव तालुक्यातील कजगाव येथील प्रतिनिधी दीपक अमृतकर व त्यांच्या कुटुंबीयांवर दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी कजगाव येथील राहत्याघरी भ्याड हल्ला झाला होता, हा भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. याबाबतचे निवेदन दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहरातील हॉटेल सुखसागर येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांना व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष कल्पेश महाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनावर पत्रकार कल्पेश महाले, आनन शिंपी, अजय कोतकर, संतोष भोई, वैभव वाघ, सोजीलाल हाडपे, राकेश निकम, महेन्द्र महाले, अजीज खाटीक, विलास पाटील यांच्या सह्या आहेत.
0
6
1
1
8
0