चाळीसगाव इलेक्ट्रिशियन असोसिएशनचा फलक अनावरण सोहळा नुकताच संपन्न.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेविभावी बहुउद्देशिय संस्था जळगाव संचलित चाळीसगाव शाखेचा उद्घाटन सोहळा १ जानेवारी २०२५ रोजी शहरातील सी.टी.पवार हॉस्पिटल समोर संपन्न झाला. स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्पेश सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव असोसिएशन शाखेच्या फलक अनावरण सोहळ्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व इलेक्ट्रिशियन, वायरमन तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना येणाऱ्या अडचणी व इलेक्ट्रिशियन यांच्या कामकाजाबाबत संस्थेचे अध्यक्ष कल्पेश सोमाणी यांनी मार्गदर्शन केले तसेच चाळीसगाव असोसिएशनची नूतन कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली.
चाळीसगाव इलेक्ट्रिशियन असोसिएशन शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंपी, उपाध्यक्ष कल्याण पाटील, सचिव शामसुंदर पुजारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
यावेळी चाळीसगाव इलेक्ट्रिशियन असोसिएशनच अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंपी, सचिव शामसुंदर पुजारी, कार्यकारणी सदस्य पॉवर टेक इलेक्ट्रिकल्स चे संचालक अहमद पठाण, निलेश जाधव, राजेश देशमुख, प्रशांत झगडे, सखाराम पागे, भूषण पवार, अनिल पवार, दिनेश वरुडे, निलेश देशमुख, संजय गढरी, गणेश कोष्टी, महेंद्र कदम यांच्यासह जळगाव, पाचोरा, येथील पदाधिकारी व सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गौरव माने यांनी मान्यवरांचे व पदाधिकारी व सभासदांचे आभार देखील मानले.