मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचा आ.मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा
उपसंपादक -कल्पेश महाले
चाळीसगाव – जनहितासाठी विविध विषयांवर आंदोलन करणारे मराठा आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते श्री.दिलीप पाटील यांनी चाळीसगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांना आपले समर्थन दिले आहे. त्यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून हा पाठिंबा दिला जाहीर केला असून तालुक्याचे महत्वाचे प्रश्न सोडविण्याची धमक मंगेश दादा चव्हाण यांच्यात असल्याने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मतदारसंघातील सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांना अजून गती मिळावी व येणाऱ्या काळात चाळीसगाव तालुका सर्वच क्षेत्रात सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या रुपाने पुन्हा एकदा आपल्याला एक तरुण व विकासाचं व्हीजन असलेल्या कृतीशील उमेदवार म्हणजेच मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करुन ही विकासगंगा अविरत सुरू ठेवायची आहे असं देखील यावेळी आंदोलक दिलीप पाटील म्हणाले.