माहिजी, बांबरुड, वरखेडी, शिंदाड, नगरदेवळा येथे अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या कॉर्नर सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद.

उपसंपादक – कल्पेश महाले
पाचोरा – पाचोरा भडगाव मतदारसंघातील गावागावांत फक्त अमोल भाऊ शिंदे आणि शेतकरी चीच चर्चा ऐकायला मिळत असून तालुक्यातील जनतेसाठी हक्कासाठी सतत उभा राहणारा सर्वांचा हक्काचा माणूस म्हणजे अमोलभाऊ पंडितराव शिंदे असून जनतेने आता अमोलभाऊ शिंदे यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे एकंदरीत चित्र दिसत असल्याचे प्रतिपादन गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण युवा मित्र यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ज्येष्ठ नागरिक बोलत होते.
पाचोरा तालुक्यातील माहिजी, बांबरुड, वरखेडी, शिंदाड, नगरदेवळा याठिकाणी अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेतल्या. त्या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत होते. गावातील आणि पंचक्रोशीतील तरुण युवा मित्र, महिला, पुरुष, अबालवृद्ध सगळ्यांनी उस्फुर्तपणे रॅली आणि सभांमध्ये सहभागी होत अमोलभाऊ पंडितराव शिंदे यांना पाठिंबा दर्शविला. या जनतेचे अमोल भाऊंवर असलेले प्रेम बघून या प्रचार सभा नाही तर विजयी मिरवणुक आहेत असं वाटत असून मतदारांनी स्वताच अमोल भाऊंना आमदार करण्याचा निश्चय केल्याचे दिसून येत आहे.
अ.क्र. ७ शेतकरी या निशाणी समोरील बटण दाबून अमोल पंडितराव शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन यावेळी केले. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात लोकांसाठी सदैव झिझणारा हक्काचा माणूस अमोल पंडितराव शिंदे हे विधानसभेत जातील यात कोणतीही शंका नाही असेही यावेळी उपस्थित नागरिक यांनी सांगितले.