जळगाव
हिंगोणे जवळील अपघातात दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू.

0
7
5
1
4
4
हिंगोणे जवळील अपघातात दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू.
संजय महाजन कजगाव
कजगाव ता, भडगाव : येथून जवळच असलेल्या हिंगोणे ता.चाळीसगाव येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वार इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतोष शिवराम पाटील असे मयताचे नाव आहे.
संतोष शिवराम पाटील (वय३८) हे दिनांक ४ च्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास चाळीसगाव हून कजगाव कडे दुचाकीने येत असताना हिंगोणे गावाजवळ त्यांची दुचाकी ही दुभाजकावर आदळली त्यात त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष पाटील हे चोपडा येथील रहिवासी असून बारामती साखर कारखाण्याचे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
0
7
5
1
4
4